औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळावा येथून देश-विदेशात विमान वाहतूक सुरू व्हावी यासाठी लागणार्या सोयी-सुविधा सुरक्षा यंत्रणा यांची तपासणी केंद्रीय गुप्तचर संस्था (आय.बी.) च्या पथकाने केली आहे. हे पथक आपला अहवाल नागरी उड्डयन मंत्रालयाला पाठविणार आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना काढल्यानंतर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यास औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात अंजिठा, वेरुळची जगप्रसिद्ध लेणी आहे. याशिवाय जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आहेत. देश-विदेशातील कंपन्या येथे आहेत. तसेच पर्यटनाची राजधानीचे शहर म्हणून ही जगात ओळख आहे. त्यामुळे चिकलठाणा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याची मागणी आहे. येथील उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ही केंद्र सरकारकडे तशी मागणी केली आहे. विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला तर देश विदेशातील मोठ्या शहरांशी आपले शहर जोडले जाणार आहे. मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजबांधव हजयात्रेसाठी जातात. तसेच परदेशातून विशेषत: जापान, थायलंड, चीन, म्यानमार, व्हिएतनाम व अन्य बौद्ध राष्ट्रातील पर्यटक अजिंठा आणि वेरुळ लेणी पाहण्यासाठी येतात. त्यांना त्यांच्या देशातून थेट औरंगाबादला येता येणार आहे. तसेच अनेक परदेशी उद्योजक कंपन्यांच्या प्रतिनिधीची ही सोय होणार आहे.
आय.बी. गुप्तचर संस्थेकडून तपासणी
स चिकलठाणा विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. काल केंद्रीय गुप्तचर संस्था आयबीचे मुंबईचे उपसंचालक एच के. पाठक, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद विभागाचे उपसंचालक वाय.एन. प्रसाद, व चिकलठाणा विमानतळ प्रमुख डी. जी. साळवे यांनी पाहणी करून तपासणी केली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आयबीचे उपसंचालक आपला अहवाल केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाला सादर करणार आहेत. या अहवालानंतर मंत्रालय अधिसूचनाच काढणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळाला दर्जा प्राप्त होणार आहे. दर्जा मिळाल्यानंतर नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे विमानतळाला पाहिजे तेवढे मनुष्यबळ मिळणार आहे. विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा यासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची आयबीचे उपसंचालक वाय. एन. प्रसाद यांनी भेट घेऊन